| मुंबई | प्रतिनिधी |
अभिनेता श्रेयस तळपदेला वयाच्या 47 व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली. या वर्षाच्या सुरुवातीला अभिनेत्री सुष्मिता सेनलाही हृदयविकाराचा झटका आला होता.
अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी मुंबईत शूट संपल्यानंतर हृदयविकाराचा झटका आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 47 वर्षीय श्रेयस ‘वेलकम टू द जंगल’चे शूटिंग करत होता आणि संध्याकाळी त्याला हृदयविकाराचा झटका आला. आता त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. श्रेयसला मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील बेले व्ह्यू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चांगली असल्याचे समजते.
सुष्मिता सेनलाही फेब्रुवारी 2023 मध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. तिची वयाच्या 47 व्या वर्षी अँजिओप्लास्टी झाली. सुष्मिता सेनने स्वतः तिच्या एका इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये खुलासा केला होता की तिच्या हृदयाकडे जाणाऱ्या मुख्य धमनीत 95% ब्लॉकेज होते.