| नागपूर | प्रतिनिधी |
अभिनेता सोनू सूद यांची पत्नी सोनाली सूद हीचा अपघात झाल्याची घटना मंगळवारी (दि.25) रोजी मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गावर घडली असून, यात सोनाली गंभीर जखमी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनू सूद यांची पत्नी सोनालीचा समृद्धी महामार्गावर अपघात झाला आहे. सोनाली सूदवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोनाली तिची बहीण आणि तिच्या मुलाबरोबर प्रवास करत होती. अपघातात सोनाली व तिच्या बहिणीचा मुलगा जखमी झाले आहेत. सध्या दोघांवरही नागपुरात उपचार सुरू आहेत. सोनाली आणि तिचा बहिणीचा मुलगा रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत, अशी माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, या अपघातात सोनालीची बहीण किरकोळ जखमी झाली आहे. अभिनयाबरोबरच सामाजिक कार्यांमध्ये अग्रेसर असलेल्या सोनू सूदची पत्नी सोनाली सूद लाइमलाइटपासून दूर राहते. ती सामाजिक कार्यांमध्ये सोनूला मदत करते. सोनू व सोनाली यांचं लग्न 1996 मध्ये झाले. सोनाली ही तेलुगू आहे. ती मूळची आंध्र प्रदेशची आहे. सोनालीने नागपूर विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. ती प्रसिद्ध चित्रपट निर्माती आहे. सोनाली व सोनू यांना अयान व इशांत ही दोन मुलं आहेत.