| पेण | प्रतिनिधी |
महाराष्ट्र शिक्षक संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी ॲड.पी.डी पाटील यांच्या अमृतमहोत्सवी जन्मदिनाचे औचित्य साधून सार्वजिनक विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पेण येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये संस्थेच्या, एनएसएस युनिट, सार्वजनिक विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, पेण प्राचार्य नाईक एस.एच, उपप्राचार्य एल.ए.पाटील, पर्यवेक्षक आर. आर. पाटील कार्यक्रम अधिकारी संदेश मोरे, प्रणित पाटील जे.जे पाटील, एनएसएस स्वयंसेवक विद्यार्थी तसेच श्री साई ब्लड सेंटर पनवेल यांनी रक्त संकलन करण्याचे काम केले. सदर शिबीरात 51 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी तरुणांनी व तरुणांनी देखील उपस्थित राहून रक्तदान केले.
या शिबीराचे उद्घाटन उत्सवमूर्ती पी.डी. पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी श्री.साई ब्लड सेंटरचे डॉ. किशारे बडगुजर, राजेश अट्टरडे, संदीप पाटील, निकीता चोरळ, अंजू पटेल, अमेय विश्वासराव आदी उपस्थित होते.
ॲड.पी.डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिबीर
