विकासासाठी अदानी फाऊंडेशन कटिबद्ध

माजी पालकमंत्री आ. आदिती तटकरे यांचे प्रतिपादन
| आगरदांडा | प्रतिनिधी |
तीन तालुक्यांतील सामाजिक क्षेत्रात अदानी दिघी पोर्ट कंपनीने चांगले काम करीत आहे. कंपनीच्या सीएसआर फंडातून गरीबांना स्वंरोजगार उपलब्ध करून देण्याचं काम अदानी दिघी पोर्ट कंपनी वेळोवेळी करीत आहे. त्याचा आदर्श सर्वच कंपन्यांनी घेतला पाहिजे. विकासासाठी अदानी फाऊंडेशन कटिबद्ध असल्याचे मत माजी पालकमंत्री तथा आमदार आदिती तटकरे यांनी कुडगाव येथील श्री महालक्ष्मी गट यांच्या मसाला कांडाप यंत्राच्या उद्घाटनप्रसंगी केले.

कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून तसेच दीप्रज्वलनाने करण्यात आली. रायगड जिल्हा परिषद शाळा कुडगावच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. उपस्थित मान्यवरांचा स्वागत पुष्पगुच्छ तसेच शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. आ. अदिती तटकरे यांच्या शेतकर्‍यांना वर्मी बेड, बायोमास चूल वाटप करण्यात आली. रांगोळी कलाकार दिघी यांचा ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार कण्यात आला. भरारी महिला बचत गट महिलांनी मशरूम प्रदान केले तर अदानी फाउंडेशन माध्यमातून आ. अदिती तटकरे यांना सन्मान भेटवस्तू प्रदान करण्यात आली.

यावेळी आ. अदिती तटकरे, ग्रामविकास अधिकारी गजानन लेंडी, ग्रामपंचायत प्रमिला मेंदाडकर, दिघी पोर्ट लिमिटेड कर्नल सिक्युरिटी हेड अरविंद सिंह बेदी, अदानी फाऊंडेशन सीएसआर मुख्य ऋषिन पटेल, मुंबई महारष्ट्र वरिष्ठ प्रकल्प अधिकारी अदानी फाऊंडेशन जयश्री काळे, जगन्नाथ खर्गावकर, प्राजक्ता आदुळकर, दामिनी घागरी, सुधा खेऊर, अवधूत पाटील, रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा कुडगाव सर्व शिक्षक वृंद, अदानी फाऊंडेशन सखी उपस्थित

Exit mobile version