| नवी दिल्ली | वार्ताहर |
अदानी समूहाच्या अडचणी अजूनही थांबलेल्या नाहीत. हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर अदानी समूहाला मोठे नुकसान सहन करावे लागले होते, त्यानंतर अदानी समूहावर कर्ज फेडण्यासाठी दबाव आला होता. त्यानंतर केनच्या अहवालाने अदानींना मोठा धक्का दिला आणि आता बाजार नियामक सेबीने अदानी समूहाच्या व्यवहारांची चौकशी करणार आहे.रॉयटर्सच्या अहवालात असे म्हटले आहे की भारतीय बाजार नियामक गौतम अदानी यांच्या भावाशी संबंधित असलेल्या अदानी समूहासोबतच्या तीन कंपन्यांच्या व्यवहारांची चौकशी करत आहे. सेबी या संस्थांसोबतच्या गैर व्यवहारांची चौकशी करत आहे.