बळीराजाच्या घामाला सर्जा-राजाची जोड

शेतीच्या कामासाठी बैलगाडीचे मोठे योगदान
| पाताळगंगा | वार्ताहर |

शेतातील राब चांगल्या प्रकारे तयार झाले असून सध्या लागवड सुरु आहे. पावसाचा जरी लपंडाव सुरु असला तरी सुद्धा पावसाच्या क्षणभंर आगमन बळीराजासाठी मोठा दिलासा मिळत आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी सध्या शेतीच्या कामात व्यस्त झाले आहे. मात्र या शेतीच्या कामामध्ये जास्त योगदान असते ते शेतकर्‍यांकडे असलेल्या बैलजोडी यामुळे शेतीची कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे.

शेतातील राब तयार झाल्यामुळे काही ठिकाणी लागवड सुरु आहे. मात्र काही शेतकरी वर्गांकडे शेतीची विभागणी झाल्यामुळे शेतातील राब एका ठिकाणाहून दुसरे ठिकाणी वाहून नेण्यासाठी या बैलगाडीचे मोठे योगदान ठरत आहे. यामुळे मनुष्यबळ वाचत असून शेती लागवडीची कामे अतिषय जलद गतीने होत आहे. यामुळे मजुरी चा खर्च वाचत आहे.

शेती लागवड करण्याकडे सध्या तरुण वर्ग वळले आहे.यामुळे वर्षभर आपल्याला धान्यांचा तुटवडा निर्माण होत नाही.मात्र बदलल्या हवामान आणी शेवटच्या क्षणांला परतीचा पाऊन यामुळेच शेतकरी दर वर्षी मोठ्या संकटात सापडत असतो.तरी सुद्धा त्यांची तमा न बाळगता जे आपल्या हातात मिळेल ते घेवून शेतकरी समाधान व्यक्त आहे.शेती करणे मोठे कठीण जात असले तरी सुद्धा ज्या व्यक्तींकडे घरातील माणसे आणी बैलजोड्या आहेत ते शेतीकरण्याकडे भर देत आहे.

Exit mobile version