निवाराशेडचे काम प्रगतीपथावर
| सोगाव | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील सोगावच्या आदिवासी वाडीवर दरड कोसळण्याच्या भीतीने आदिवासी धास्तावले आहेत. या आदिवासींना पर्याय म्हणून मापगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लवकरच निवाराशेडचे काम प्रगतीपथावर असल्याचे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुनील थळे यांनी सांगितले.
सोगाव आदिवासीवाडीतील घरे डोंगर उतारावर असल्याने शिवाय डोंगरालगत असल्याने याठिकाणच्या घरांवर पावसामुळे दरड कोसळण्याची शक्यता आहे. हा धोका ओळखून आणि होणार्या जीवित व वित्तहानीपासून वाचण्यासाठी ग्रामपंचायतीने तातडीने याठिकाणी निवाराशेड बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. याबाबत माहिती देताना लवकरच आम्ही आदिवासींच्या निवासाची सोय करीत दिलासा देणार असल्याचे सुनील थळे यांनी सांगितले.
दरम्यान, निवासाची सोय ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व माजी उपसरपंच समद कुर आणि सचिन घाडी यांच्या प्रयत्नाने पूर्ण होत असल्याबद्दल सर्व आदिवासी बांधवांनी त्यांचे आभार मानले आहेत.
दरडीच्या भीतीने आदिवासी भयभीत
