सुनील थळेंच्या हस्ते कामाचे उद्घाटन
| सोगाव | वार्ताहर |
महाराष्ट्र शासन निर्णय व जिल्हा नियोजन समितीच्या प्रशासकीय मान्यतेने क्रीडांगण विकास योजनेंतर्गत अलिबाग तालुक्यातील मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील मुनवली येथे क्रिकेट मैदानाचे समपातळीकरण कामाचे उद्घाटन माजी सरपंच सुनील थळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी श्री. थळे यांनी सांगितले की, मुनवली गावाचे स्वतःचे क्रिकेट मैदान आहे, यामुळे मुनवली ग्रामस्थ भाग्यवान आहेत, कित्येक गावांना स्वतःचे मैदान नाही, त्यामुळे त्या ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. या मैदानात मोठ्या प्रमाणात खड्डे व उंच सखल भाग असल्याने खेळाडूंना क्रिकेट खेळताना व इतर कार्यक्रम आयोजित करताना अडचणी व गैरसोय होत होती. याबद्दल ग्रामपंचायत सदस्या सानिका घाडी व सचिन घाडी यांनी मापगाव ग्रामपंचायतीकडे मैदान समपातळीकरण करण्यासाठी पाठपुरावा केला होता. ही मागणी लक्षात घेऊन सरपंच उनीता थळे यांनी मान्यता दिली, यासाठी युवा नेता सूचित थळे यांनी प्रशासकीय कागदपत्रांची पूर्तता करत प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी पाठपुरावा केला.
याप्रसंगी सुनील थळे यांच्यासह माजी उपसरपंच समद कुर, प्रकाश वडे, विवेक जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रफुल्ल पाटील, संजय शिंदे, आत्माराम पंडम, बाळाराम थळे, ग्रामपंचायत सदस्या सानिका घाडी, मधुकर सूद, सुधाकर ठकरुळ, दिलीप मोंढे, सूचित थळे, सतीश घाडी, सचिन घाडी, शैलेश तिर्लोटकर, किशोर मोंढे, संतोष बांद्रे, किशोर नागावकर, सुरेश हाके, मनीष खाडे, अशोक मोंढे, रुपेश अनमाने, संदेश पाटील, अजित हरवडे, सुनील अनमाने, राजेश परब, नितीन हेलम आदी मान्यवरांसह मुनवली महिला मंडळाच्या कार्यकर्त्या सुप्रिया ठकरुळ, निर्मला पंडम, मनीषा सूद, वनिता ठकरुळ, माई काजरेकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







