‘ती’ बोट बाहेर काढण्यात प्रशासनाला अपयश

| श्रीवर्धन | वार्ताहर |
ऑगस्ट महिन्याच्या 18 तारखेला हरिहरेश्‍वर समुद्रकिनारी मंदिराच्या जवळच सकाळच्या वेळेला एक संशयास्पद बोट आढळून आली होती. या घटनेने रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हायअलर्ट घोषित करण्यात आला होता.

याच काळामध्ये विधिमंडळाचे अधिवेशन सुद्धा सुरू होते. बोट सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर विधिमंडळात सुद्धा याबाबत अनेकांनी आपले म्हणणे मांडले होते. सदर बोटी मध्ये ए के 47 रायफली आढळून आल्या होत्या. तसेच रायफल च्या गोळ्यांचे सहाशेपेक्षा जास्त राऊंड आढळून आले होते. सद्यःस्थितीमध्ये बोटीचा काही भाग हा किनारपट्टीला भरतीच्या पाण्याने वाहून आला आहे. तर, ज्या भागामध्ये इंजिन आहे, तो भाग पूर्णपणे वाळूमध्ये रुतत चालला आहे. अजून दोन दिवसांनंतर ही बोट सापडल्याला एक महिना पूर्ण होईल. परंतु, प्रशासनाला ही बोट समुद्रातून बाहेर काढण्यास अद्याप तरी अपयश आल्याचे पाहायला मिळत आहे.

Exit mobile version