। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर समुद्रात १६ मीटर लांबीची दुर्घटनाग्रस्त संशयास्पद बोटी आढळून अली आहेत. स्थानिकांच्या मदतीनं ही बोट किनार्यावर आणण्यात आली. या बोटींमध्ये तीन एके 47 रायफल तसेच दारुगोळा सापडल्याने खळबळ उडाली. हि घटना निदर्शनास येताच तात्काळ किनारपट्टीवर नाकाबंदीचे आदेश देण्यात आले.
या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात पोलिसांकडून हायअलर्ट जारी केला गेला आहे तसेच अधिक तपासानंतर सादर संशयित बोट हाना लॉडर्सगन या ऑस्ट्रेलियन महिलेची असून तिचे पती जेम्स हार्बट हे या बोटीचे कॅप्टन आहेत. ही बोट मस्कतहुन यूरोपकडे जाणार होती असे तपासात समजले आहे. २६ जून रोजी या बोटीचे इंजिन निकामी झाले व त्यानंतर खलाशांची एका कोरियन युद्ध नौकेने मदत केली व त्यांना ओमानला सुपूर्द केले.
समुद्र खवळलेला असल्या कारणास्तव ही बोट भरकटत हरिहरेश्वरच्या किनाऱ्याला लागली आहे अशी माहिती भारतीय कोस्ट गार्ड कडून प्राप्त झालेली आहे.सादर घटनेचा तपास स्थानिक पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक हे करीत असून आगामी सणांच्या पार्शवभूमीवर सर्व पोलीस घटकांना सतर्कतेचा आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती विधानसभेत गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिली.