मतमोजणीकरिता प्रशासन सज्ज

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यातील काकळघर, कोर्लई, वेळास्ते व वावडुंगी अशा एकूण चार ग्रामपंचायत निवडणुकीकरिता रविवारी मतदान झाले असून, उद्या सकाळी 10 वाजल्यापासून मुरुड तहसीलदार कार्यालयासमोरील दरबार हॉलमध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्याकरिता प्रशासन सज्ज झाले आहे, अशी माहिती मुरुड तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी रोहन शिंदे व निवडणूक नायब तहसीलदार अमित पुरी यांनी दिली.

4 सरपंचपदाकरीता 13 तर 32 सदस्यपदाकरिता 71 उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीकरिता 4900 हजार मतदारांनी आपला हक्क बजावला होता.

वावडुंगी ग्रामपंचायतकरिता 767 जणांनी मतदान केलं. वेळास्ते 846, कोर्लई 1854 तर काकळघर ग्रामपंचायतीकरिता 1433 जणांनी मतदान केले. या निवडणुकीत स्त्री -2523 व पुरुष 2377 अशा एकूण 4900 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणूकीत वापरण्यात आलेल्या ईव्हीएम यंत्र सील करुन तहसीलदार कार्यालयात ठेवण्यात आल्या आहेत. याठिकाणी मुरुड पोलीस ठाण्यामार्फत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अत्यंत अटीतटीच्या व चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत प्रत्येक पक्षाकडून विजयाचा दावा केला असला तरी उद्या मंगळवारी 20 डिसेंबरला प्रत्यक्ष मतमोजणीनंतर मतदारांचा कौल स्पष्ट होईल.

Exit mobile version