प्रशासनाचे मतदार राजांना मतदानासाठी आवाहन

| पाली | वार्ताहर |

लोकसभेसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यापार्श्‍वभूमीवर सुधागडातील भेरव याठिकाणी मतदारांनी लोकसभेसाठी जास्तीत जास्त टक्के मतदानाचा अधिकार बजावावा यासाठी सुधागड तालुका तहसीलदार तथा सहा.निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे.

मागील लोकसभा निवडणुकीला भेरव येथील मतदार केंद्रावर केवळ 16 टक्के इतकेच मतदान झाले होते त्यामुळे यावेळी हा टक्का वाढावा यासाठी तहसीलदारांकडून मतदारांना आवाहन करण्यात आले. आपले मत हे अमूल्य आहे.संविधानाने आपल्याला आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार दिलेला आहे. आपल्या मताची शासन स्तरावर नोंद झाली पाहिजे. आपले मत वाया जाऊ नये तसेच ठाणे, मुंबई, पुणे सारख्या बाहेरगावी राहणार्‍या मतदारांना देखील मतदानासाठी येण्याचे व बहुसंखेने उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन नायब तहसीलदार ज्ञानेश्‍वर अडसुळे यांनी केले आहे.

यावेळी मंडळ अधिकारी अंकुश साळवे, तलाठी उद्धव गुंजाळ, पोलीस पाटील अमिषा सागळे, सामाजिक कार्यकर्ते अतिश सागळे, सतीश मांढरे, मंगेश मांढरे, सोनाली मांढरे, दीपक पुशीलकर, रामचंद्र मोरे, प्रभाकर टक्के शाळेतील शिक्षिका रश्मी लखीमळे, तसेच महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version