छबिना उत्सवाला प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य

प्रांताधिकारी प्रतिभा पुदलवाड याचे प्रतिपादन
| महाड । प्रतिनिधी |

महाड पोलादपूरचे आराध्य दैवत असलेल्या श्री वीरेश्‍वर महाराजांचा छबिना उत्सव 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. हा उत्सव शांततेत आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यासाठी प्रशासनाकडून सर्व प्रकारे सहकार्य केले जाईल असे प्रतिपादन महाडच्या प्रांताधिकारी प्रतिभा पुदलवाड यांनी केले. श्री. वीरेश्‍वर देवस्थान पंच कमिटी, स्थानिक प्रशासनांची शुक्रवारी संयुक्त बैठक महाड प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आली होती.

याप्रसंगी महाडचे तहसीलदार सुरेश काशीद, पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे, मुख्याधिकारी महादेव रोडगे, नायब तहसीलदार सुरेश खोपकर, देवस्थान पंचकमिटीचे दीपक वारंगे, रमेश नातेकर, विश्‍वस्त अनंत शेठ,गणेश वडके, संजय पवार, सुभाष शिंदे, गजानन काप, सूर्यकांत शिलीमकर, सुदेश कळमकर, उमेश जगताप, निलेश वारंगे ,राजेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शासनाकडून पंच कमेटीला काही मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या त्या अमलात आणण्याकरिता प्रशासनाचे सहकार्य राहील. महाशिवरात्रीच्या उत्सव देखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असल्याने नागरिकांनी उत्सव शांततेत आणि आनंदी वातावरणात साजरा करावा असे आवाहन करण्यात आले.

Exit mobile version