| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील पेशवे कालीन रस्ता शासनाच्या उदासीनतेमुळे विजनवासात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी शासनाने गेल्या काही वर्षांत एक रुपयांचा निधी देखील खर्च केलेला नाही. त्यामुळे कल्याण-कर्जत राज्यमार्गावरील दामत फाटकपासून धामोते गावाच्या हद्दीपर्यंतचा रस्ता अखेरच्या घटका मोजत आहे. नेरळ विकास प्राधिकरण आपल्या हद्दीमधील रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा अरोप स्थानिकांमधून केला जात आहे.
नेरळ गावात वाहनांची संख्या वाढली आहे. नेरळ गावाला वळसा घालून जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने नेरळ गावात वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. त्यामुळे नेरळ गावाच्या बाहेरून जाणाऱ्या पेशवाई रस्त्यावरील साई मंदिर ते दामत फाटक या रस्त्याचे शासनाने मजबुतीकरण केल्यास नेरळ गावातील वाहनाची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे. मात्र, त्या रस्त्याकडे शासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाले असल्याने शेवटी हा रस्ता अवजड वाहने आणि बैलगाडी यांच्या पुरता मर्यादित राहिला आहे. अनेक वर्षे हा रस्ता तसाच असल्याने रस्त्यात दगड, खडी पेक्षा मातीच जास्त असून सध्या या रस्त्यात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.
रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी प्रशासनाचे दुर्लक्ष
