तटकरे तंत्रनिकेतन कोलाड येथे प्रवेश अर्ज भरण्याची मोफत सुविधा
। कोलाड । वार्ताहर ।
पदविका (डिप्लोमा) ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया वर्ष 2021-22 तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत दि. 30 जूनपासून सुरु केली जाणार आहे. यावर्षी कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा घेणे शक्य झाले नाही व अद्याप दहावीचा निकालसुद्धा प्रकाशित झालेला नाही. परंतु, यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी थांबण्याची आवश्यकता नाही. कारण, विद्यार्थी दहावीचा परीक्षा आसन क्रमांक नोंदवून प्रवेश प्रकियेमध्ये नोंदणी करून सहभागी होता येणार आहे.
कोरोनाचा वाढता प्रभाव लक्ष्यात घेता, यावर्षी Physical Scrutiny व E-scrutiny चा पर्याय विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. तरी या संदर्भात तटकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या श्रीमती गीता द तटकरे तंत्रनिकेतन, कोलाड यांच्यामार्फत मोफत डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया अर्ज भरून दिले जाणार असल्याची माहिती तंत्रनिकेतनचे प्राचार्य विपुल मसाल यांच्यामार्फत देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी तंत्रनिकेतन मध्ये प्रत्यक्षरित्या भेट देण्यास शक्य असल्यास भेट द्यावी, अन्यथा पुढे दिलेल्या क्रमांकावर कॉल करून आपली माहिती पुरवल्यास आपला ऑनलाईन प्रवेश फोनवरून अर्ज भरून दिला जाईल व निश्चित केला जाईल. अधिक माहितीसाठी 9765972771/8308441600/8805898546/8378897222/8378897111 या क्रमांकांवर संपर्क साधावा.