पालिकेच्या निर्णयाचे पनवेलकरांकडून स्वागत
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
सर्वसामान्य घटकातील मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे या हेतूने महानगरपालिकेमार्फत शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करण्यात आली आहे. शैक्षणिक 2023-24 साठी ज्युनियर केजीच्या वर्गामध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. मागील वर्षी या महापालिकेच्या या शाळेला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळला होता. या शाळेचे पनवेलकरांकडून स्वागत होत आहे.
आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युनियर के.जी. या वर्गाचे द्वितीय वर्ष लोकनेते दि.बा. पाटील विद्यालय येथे सुरू होत आहे. या वर्गातील विद्यार्थ्यांची क्षमता 40 असणार आहे. महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षण मोफत असणार आहे. पनवेल मनपा इंग्रजी शाळेच्या तीन कि.मी.च्या परिसरातील विद्यार्थ्यांना सदर प्रवेश प्रक्रियेमध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. या वर्गासाठी प्रवेश अर्ज प्रक्रिया दि. 27 सकाळी दहा वाजल्यापासून सुरु होणार आहे. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील इच्छुक नागरिकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी लवकरात लवकर प्रवेश अर्ज भरण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. प्रवेश घेण्यास इच्छुक बालकाचे वय 5 वर्ष 5 महिने 30 दिवस इतके असणे गरजेचे आहे.
या प्रवेश अर्जांची लॉटरी दिनांक 17 एप्रिल दुपारी 11 वाजता काढण्यात येणार आहे. प्रवेश अर्ज लोकनेते दि.बा. पाटील विद्यालय, दांडेकर हॉस्पिटल व आगरी समाज हॉल समोर उपलब्ध असणार आहेत. तसेच अधिक माहितीसाठी भारती धोंगडे (8097570697), सोनल भिसे (9773469803) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी(प्र) श्रीम. कीर्ती महाजन यांनी केले आहे.