बीड जिल्हयात तरूणांचा शेकापमध्ये प्रवेश

मान्यवरांच्या उपस्थितीत लालबावटा घेतला खांद्यावर
। बीड । प्रतिनिधी ।
समाजातील दीन-दुर्बल, वंचितांच्या न्यायहक्कासाठी कृतीशील लढा देणार्‍या शेतकरी कामगार पक्षावर असलेला तरूणाईचा विश्‍वास अधिक बळावत आहे. याचेच उदाहरण म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे लढाऊ नेते भाई मोहन गुंड व भाई अ‍ॅड. नारायण गोलेपाटील यांच्या नेतृत्वाखाली माजलगाव तालुक्यातील शुक्लतिर्थ लिमगाव येथील तरूणांंनी खांद्यावर शेकापचा लालबाबटा घेेत पक्षप्रवेश केला आहे.
तरूणाई हा देशाचा कणा आहे. तर गोरगरीब, बहुजन, वंचित अशा जनतेसाठी शेतकरी कामगार पक्ष गेली अनेक दक्षके कार्यतत्पर आहे. समाजाच्या सुयोग्य, विधायक विकासाठी ही शक्ती एकत्र येऊन चळवळ उभी करणे, आवश्यक आहे. आणि याच पार्श्‍वभूमीवर पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते पक्षाची तरूणाच्या दृष्टीने मोट बांधत आहेत. याच उपक्रमाची फलश्रृती माजगाव तालुक्यात आली आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते भाई मुंजा पांचाळ, गणेश कदम यांच्या उपस्थितीत अनंत चव्हाण, बाबू वगरे, विष्णू शेळके, हनुमान मुळे, बाळू पंडित, मुकेश शेरकर, नवनाथ वगरे, बबलू शेरकर, विठ्ठल वैद्य, राजेभाऊ शेरकर, मदन चव्हाण, अजय शेरकर, वैभव खंडूळ, यांच्यासह अनेक तरुणांनी शेकडो गावकर्‍यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.
यासमयी, शेतकर्‍याच्या, कष्टकर्‍याच्या प्रश्‍नावर आक्रमक लढा उभारण्यासाठी तरुणांनी शेकापचा लाल झेंडा खांद्यावर घेऊन लढायला तयार झाले पाहीजे, असे मार्गदर्शक व्यक्तव्य केले. तर भाई अ‍ॅड.नारायण गोलेपाटील यांनी शेकाप हा नितिमान राजकीय पक्ष असुन तो श्रमिकांच्या हितासाठी लढणारा पक्ष आहे. त्याने सदैवच बहुजनांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी यशस्वी प्रयत्न केल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
या दरम्यान, ग्रामस्थांनी शेकाप नेत्यांचे फटाक्यांच्या आतीषबाजीत तसेच हलगीच्या जोशात स्वागत करून मिरवणूक काढली. यावेळी लहान मुले, अबालवृद्ध, महिलावर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Exit mobile version