बीड | प्रतिनिधी |
माजलगाव तालुक्यातील शुक्लतिर्थ लिमगाव येथे शेतकरी कामगार पक्षाचे लढाऊ नेते भाई मोहन गुंड व भाई अॅड.नारायण गोलेपाटील यांच्या नेतृत्वाखाली भाई मुंजा पांचाळ, गणेश कदम यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षात अनंत चव्हाण, बाबू वगरे, विष्णू शेळके, हनुमान मुळे, बाळू पंडित, मुकेश शेरकर,नवनाथ वगरे, बबलू शेरकर, विठ्ठल वैद्य, राजेभाऊ शेरकर, मदन चव्हाण, अजय शेरकर, वैभव खंडूळ, यांच्यासह अनेक तरुणांनी शेकडो गावकर्यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला त्यावेळी भाई मोहन गुंड यांनी शेतकर्यांच्या, कष्टकर्यांच्या प्रश्नावर अक्रमक लढा उभारण्यासाठी तरुणांनी शेकापचा लाल झेंडा खांद्यावर घेऊन लढायला तयार झाले पाहीजे असे वक्तव्य केले तर भाई अॅड.नारायण गोलेपाटील यांनी शेकाप हा नितिमान राजकीय पक्ष असुन श्रमीकांच्या हितासाठी लढणारा पक्ष असल्याचे सांगुन गावकर्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे प्रतिपादन केले, शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांचे गावकऱ्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करून हलगीच्या जोशात मिरवणूक काढून सभास्थळी आणले व भव्यदिव्य स्वागत केले. यावेळी लहान मुले, तरुण, वयोवृद्ध शेतकरी बांधव, प्रतिष्ठित नागरिक, माता-भगिनी यांची प्रचंड उपस्थिती होती.