। ठाणे । प्रतिनिधी ।
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार राज्य सरकारने रिक्षा व टॅक्सीचालकांना स्थानिक भौगोलिक माहितीबरोबरच मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक केले आहे. त्यानुसार ठाणे आरटीओकडून शहरातील विविध भागांत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली.
1 मेपासून रिक्षाचालकांच्या मराठी भाषा ज्ञानाची विशेष तपासणी मोहीम सुरू झाली आहे. 15 ऑगस्टपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. या मोहिमेत चालकांचे परवाने, बॅज, कागदपत्रांची पडताळणी करण्यासोबतच त्यांना मराठीत संवाद साधता येतो का, प्रवाशांनी सांगितलेले पत्ते समजतात का, तसेच दैनंदिन व्यवहार मराठीत करता येतात का, याचीही तपासणी केली. ज्या 142 चालकांना मराठीचे व्यावहारिक ज्ञान नसल्याचे आढळले, त्यांना प्रशिक्षण घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.







