। पंढरपूर । प्रतिनिधी ।
बी.फार्मसीच्या पदवी अभ्यासक्रमातील द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून स्वेरी फार्मसीला फॅसिलिटेशन सेंटर म्हणून मान्यताही मिळालेली आहे. ही प्रक्रिया 14 नोव्हें. पर्यंत चालणार असल्याची माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव तथा प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. थेट द्वितीय वर्ष रजिस्ट्रेशन साठीचे शुल्क खुला प्रवर्ग-800 रु. आणि इतर प्रवर्ग-600 रु. असे आहे. प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी प्रा. रामदास नाईकनवरे (8390906146) किंवा स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार (9545553888) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे तसेच प्रवेश अर्ज भरताना होणार्या चुका टाळण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात येऊन अर्ज भरण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.