भातासाठी ऐसआरटीफचा अवलंब करा

कृषी अधिकारी आनंद कांबळे यांची माहिती
। तळा । वार्ताहर ।
सध्या भातपीक पद्धतीत बदल होत असून, एसआरटी पद्धतीने भातलागवड केल्यास ती अधिक फायदेशीर ठरेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. यासाठी शासन शेतकरी बांधवांना प्रोत्साहन म्हणून अनुदान तत्त्वावर भात बियाणे, खते पुरवित असल्याने या पद्धतीने लागवड करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी केले आहे. या पद्धतीमध्ये लागवड केल्यास राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कर्जत-9 हे भात बियाणे 25 किलोची पिशवी 1500 रुपये असून, अनुदान 500 रुपये असल्याने 1000 रुपयांत हे बियाणे मिळत आहे. याचबरोबर यामध्ये युरिया ब्रिकेट खत शासन देणार आहे. तरी या पद्धतीने लागवड केल्यास ती फायदेशीर ठरेल.

ही लागवड करताना शेताच्या जमिनीची उभी आडवी नांगरणी करून गादी वाफे तयार करावेत. वाफ्यांच्या मध्ये चरी असल्याने पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार आहे. पाऊस पडल्यावर जमीन ओली झाल्यानंतर साच्याच्या सहाय्याने भोक पाडून घ्यावीत. यामध्ये 5 ते 6 भाताचे दाणे टाकावे व ती भोके मातीच्या सहाय्याने बुजवून घ्यावीत. बियाणे उगवण्याआधी गोलनामक तृणनाशकाची फवारणी करावी. जेणे करून तण वाढणार नाहीत. मात्र, ही फवारणी तातडीने करणे गरजेचे आहे.

एकरासाठी 16 किलो बियाणे
या पद्धतीमध्ये लागवड केल्यास एक एकर जमिनीमध्ये 16 किलो भातबियाणे लागते. भात बियाणे बुरशीजन्य औषधे लावूनच लागवड करावी. यासाठी आपल्या घरातील 5 ते 6 माणसे सहा तासांत हे बियाणे लागवड करू शकतात. बियाणे टाकताना जास्त पाणी नसल्याची काळजी घ्यावी. बियाणे खोल गेल्यास बियाणे कुजण्याचा संभव असतो. त्यामुळे बियाणे वरती कसं राहील याची काळजी घ्यावी. तणनाशक हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तणनाशक (गोल) तणनाशक हे 1 लीटर पाण्यात 1 एम एल टाकून पाठीवरील पंपाच्या सहाय्य

Exit mobile version