जे.एम.म्हात्रे चॅरिटेबलने स्वीकारले पालकत्व

| पनवेल | वार्ताहर |

इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त बांधवांच्या तात्पुरता निवारा केंद्रात पनवेल पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी ममता म्हात्रे गेले होते. तेथील लहान मुली आणि महिलांशी ममता म्हात्रे यांनी संवाद साधला. त्यानंतर जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून या बांधवांपैकी काही जणांना शैक्षणिक आणि रोजगारामध्ये पालकत्व स्वीकारावे असा निर्णय पनवेल पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि ममता प्रितम म्हात्रे यांनी घेतला.

याबाबत खालापूर विभागीय तहसीलदार, प्रांत आणि रायगड जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष लेखी स्वरूपात मागणी केली. ज्यामध्ये कुटुंबाचे छत्र हरपलेल्या तेथील तीन लहान बहिणी त्यांच्या शिक्षणाचा भार उचलणे, त्याचबरोबर तेथील सात तरुणांना त्यांच्या क्षमतेनुसार नोकरी सुद्धा देण्यास तयार असल्याचे प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी सांगितले आहे. शासनाकडून सद्य परिस्थितीत करण्यात आलेल्या तेथील व्यवस्थेबाबत यावेळी माहिती देखील घेतली.

Exit mobile version