। पनवेल । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेली शेतकरी कामगार पक्षाची सत्ता असलेली व सरपंच अनिल ढवळे यांच्या नेतृत्वाखाली उत्तम कार्य सुरू असणार्या ग्रुप ग्रामपंचायत शिवकरचे कोकण विभागीय परीक्षण पार पडले. यावेळी आयोजित सभेला प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांसोबत संवाद साधला.
यावेळी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह ठाणे जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, माजी सैनिक समीर दुंद्रेकर, पनवेल पंचायत समितीचे बी.डी.ओ. संजय भोये, विस्तार अधिकारी विश्वास म्हात्रे, विस्तार अधिकारी अविनाश घरत, रा.जि.प अधिकारी अविनाश घरत, जयवंत गायकवाड, शिवकर सरपंच अनिल ढवळे, सदस्य सूरज भगत, विष्णू पाटील, ज्योती पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.