कर्जत तालुक्यात यांत्रिक पद्धतीचा अवलंब

| नेरळ | प्रतिनिधी |

सध्याची भातशेती ही मजूर मिळत नसल्याने आर्थिक दृष्ट्‌‍या खर्चिक बनली आहे. खर्चिक बनलेल्या भात शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जावा आणि आर्थिक गणिते जुळावीत या हेतूने कर्जत तालुक्यातील वदप या गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन यांत्रिक पद्धतीने कर्जत 7 जातीचे भात लागवड करण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

खरीप हंगामामध्ये भात हे कर्जत तालुक्यातील प्रमुख पीक असून, तालुक्यातील बहुतांश शेतकरी भात शेतीवर अवलंबून आहेत. मात्र, दिवसेंदिवस वाढणारी मजूर टंचाई वाढता मजुरी खर्च लागवडीसाठी लागणारा मोठा वेळ आणि बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पारंपारिक पद्धतीने भात लागवड करणे शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर यांत्रिकीकरणाचा स्वीकार हा काळाची गरज असून, ही गरज लक्षात घेऊन वदप येथील प्रगतशील शेतकरी ॲड.अजित पाटील, निलिकेश दळवी,अमित शिंदे या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भात शेती अधिक फायदेशीर व शाश्वत करण्याची आवश्यकता असल्याकारणाने यांत्रिक पद्धतीचा अवलंब करत भात शेतीची लागवड केली आहे.

भात शेतीची पाहणी करण्याकरता कृषी विभागाचे सहसंचालक बालाजी ताटे यांनी या शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर जाऊन पिकाची पाहणी करून वयोवृद्ध शेतकरी खंडू रघुनाथ शिंदे यांचे यांत्रिकी पद्धतीने शेती कशी सोपी झाली हे त्यांच्या शब्दात अनुभवले. अधिकाधिक यांत्रिकीकरणाचा वापर व्हावा ज्यामुळे खर्च कमी होऊन शेती उत्पन्नात वाढ होईल. शेती ही आर्थिक दृष्ट्‌‍या कितपतशीर व्हावी यासाठी सहसंचालक मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी सुळ, तालुक कृषी अधिकारी शिंदे, प्रगती शेतकरी ॲड. अजित पाटील, निलीकेश दळवी, शिंदे अमित शिंदे, नयनिश दळवी, सचिन केने, दिनेश कोळी, शशिकांत गोसावी, किरण गंगावणे सहायक कृषी अधिकारी किरण शिंदे, विजय गंगावणे, शिवाजी लोहकरे आदी उपस्थित होते.

Exit mobile version