। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
शहरातील मारुती मंदिर सर्कल-मजगाव बसस्टॉपजवळ दारूच्या नशेत पडून जखमी झालेल्या प्रौढाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगेश यशवंत भारती (52, रा. तोणदे, रत्नागिरी) असे जखमी प्रौढाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. 18) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश दारूच्या नशेत मजगाव एसटी बसस्टॉप येथे जखमी अवस्थेत पडलेला होता. त्या वेळी तेथील रिक्षाचालक लियाकत युसूफ हपशी (रा. साखरतर, रत्नागिरी) याने त्या ठिकाणी पाहिले असता तो प्रौढ दारूच्या नशेत पडल्याने डोक्याला मार लागून जखमी अवस्थेत दिसून आला. रिक्षाचालक लियाकत यांनी माणुसकीच्या नात्याने तेथील आयटीआयच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने रिक्षाने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.







