। आंबेजोगाई । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, सहकार महर्षी, आंबा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक तथा संचालक भाई अॅड. अनंत बापु चव्हाण यांचे सोमवारी आंबेजोगाई येथे निधन झाले. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्वाची पदे सांभाळली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. बीड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने देखील याबाबत शोक व्यक्त केला.