अ‍ॅड. बी.एस.पाटील यांचे निधन

। उरण । प्रतिनिधी ।
उरण बार असोसिएशनचे सदस्य अ‍ॅड. बी.एस.पाटील यांचे मंगळवारी (दि.23) सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. वकिली करीत असतानाही त्यांनी गोरगरिबांची सेवा करण्यात धन्यता मानली होती.
मनमिळावू स्वभावाचे अ‍ॅड. पाटील यांनी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी निष्ठेने काम केले. वेळप्रसंगी गोरगरिबांकडे पैसे नसले तरी मोफत वकिली करून न्याय मिळवून दिला. त्यामुळे ते गोरगरिबांचे वकील म्हणून प्रसिद्ध होते.

अ‍ॅड. पाटील यांचे जन्मगाव जसखार होते. परंतु कित्येक वर्षांपासून उरण शहरातील आनंदनगर येथे ते वास्तव्यास होते. त्यांच्या निधनानंतर जसखार या जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, आई, भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे.

Exit mobile version