अ‍ॅड. पुंडलिक मालोरे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत

। माणगाव । वार्ताहर ।

दिवाणी व फौजदारी न्यायालयातील प्रथितयश वकील अ‍ॅड. पुंडलिक मालोरे यांना आविष्कार फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेतर्फे राज्यस्तरीय “महाराष्ट्र रत्न गौरव“ पुरस्कार 2024 ने नुकतेच सन्मानित करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, बाजी प्रभू देशपांडे चौक, पन्हाळगड, जि. कोल्हापूर या ठिकाणी झालेल्या भव्य दिव्य अशा कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे न्यूरोसर्जन डॉ. संतोष प्रभू यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. अ‍ॅड. पुंडलिक मालोरे उपरोक्त संस्थेकडून “महाराष्ट्र रत्न गौरव“ पुरस्कार 2024 ने सन्मानीत करण्यात आल्याने त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

या पुरस्कार सोहळ्याला फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार संजय पवार, राज्य पुरस्कार निवड समिती सदस्य माधुरी सावंत, फाऊंडेशनचे रायगड जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष किशोर मोहिते आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version