| माणगाव । वार्ताहर ।
माणगाव येथील प्रसिद्ध डॉ. दिपक रमेश देशमुख यांना अविष्कार फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेतर्फे राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2023 जाहीर झाला असल्याची माहिती संजय पवार व फाऊंडेशनचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष शंकर शिंदे यांनी दिली. या पुरस्काराचे वितरण रविवार दि.30 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वा. जोतिबा रॉयल रिसॉर्ट, श्री क्षेत्र जोतिबा (वाडी- रत्नागिरी) ता. पन्हाळा जि. कोल्हापूर याठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेतर्फे देण्यात आली आहे. डॉ. देशमुख यांची उपरोक्त संस्थेकडून राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.