| तळा । वार्ताहर ।
रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांदाड येथील मुख्याध्यापक विजय विक्रम पवार व विषय शिक्षिका कल्पना विजय पवार यांची नंदुरबार जिल्ह्यात बदली झाली. या वेळी मादांड ग्रामस्थ मंडळ रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांदाड यांचे संयुक्त विद्यमाने या दोघांना निरोप देण्यात आला. कर्म प्रामाणिकपणे केल्यास समाज त्याचे कौतुक करेल. असे विचार पुरुषोत्तम मुळे यांनी व्यक्त केलेे.
यावेळी तळा गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट, अरुण पिंपळे, किसन मालुसरे, उर्वशी मालुसरे, राजश्री जगताप, रोमांकि गंभीर, प्रतीक्षा कारंजे, सौ मालुसरे, विठोबा देवकर, विजय येलवे, संदीप जामकर, कृष्णा कांबळे, स्वप्नील म्हात्रे, श्री मोंढे, धनंजय पवार, भगत, पटाईत, विजापूरे, सौ मचे, श्री व सौ चव्हाण, महिला मंडळ अध्यक्षा, ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष, कोळी समाज अध्यक्ष पिठे, बौद्ध समाज अध्यक्ष शिंदे, यांचे सह पवार कुटुंबिय, शिक्षक वृंद, मित्रपरिवार, ग्रामस्थ महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.