| पनवेल । वार्ताहर ।
दिवसेंदिवस उन्हाच्या तीव्रतेत खूपच वाढ होत आहे. उष्णतेमुळे नागरिक गारव्याचा शोध घेत आहेत. उन्हापासून व उकाड्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी लहानमुलांसह थोरांपर्यंत लस्सी, आमरस, बर्फ-गोला, कलिंगड, आईस्क्रीम, गारेगारवाला, शीतपेय अशा थंड पदार्थाकडे आकर्षित होऊ लागले आहेत. त्यामुळे थंड पदार्थ, शीतपेये विक्री करणार्या व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत.
गेल्या महिन्याभरापासून दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असून तापमान वाढले आहे. त्यामुळे जीव हैराण करणार्या उकाड्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी लहानथोर मंडळी विविध प्रकारचे उपाय करत आहेत. तापमान वाढल्याने शरीरातील पाणी कमी होत असल्याने आणि उकाड्यापासून सुटका मिळण्यासाठी थंडगार काकडी, उसाचा रस, आईस्क्रीम, गोळे इत्यादी पदार्थ घेण्यासाठी गर्दी होत आहे. लहानगेदेखील थंडावा देणारे पदार्थ खरेदी करीत आहेत.