| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुका बार असोसिएशनच्या सन 2026-2028 या कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत ॲड. किशोर धनाजी ठाकूर यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. जेष्ठ विधीज्ञ ॲड. प्रमोद महादेव ठाकूर यांचे शिष्य असलेल्या ॲड. ठाकूर यांनी 114 मते मिळवत दणदणीत विजय संपादन केला.
ही निवडणूक 29 एप्रिल 2026 रोजी पार पडली. एकूण 199 वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला. अध्यक्षपदासाठी ॲड. निनाद नाईक यांना 83 मते, तर ॲड. दत्तात्रेय नवाळे यांना 1 मत मिळाले. 1 मत नोटाला मिळाले. उपाध्यक्षपदासाठी ॲड. योगेश म्हात्रे (104 मते) विजयी झाले, तर ॲड. अमर पाटील यांना 92 मते मिळाली. महिला उपाध्यक्षपदी ॲड. प्राची जोशी (102 मते) निवडून आल्या. ॲड. भारती भोईर (74 मते) व ॲड. वृशाली पाटील (15 मते) यांना अनुक्रमे मते मिळाली. सचिवपदी ॲड. रोशनी बारे (103 मते) विजयी झाल्या, तर ॲड. धीरज डाकी यांना 88 मते मिळाली. सहसचिवपदी ॲड. प्रज्ञा सरवणकर (96 मते) यांनी ॲड. संतोष पाटील (95 मते) यांचा अल्प फरकाने पराभव केला. या पदासाठी नोटाला 8 मते मिळाली. खजिनदारपदी ॲड. किशोर पाटील (105 मते) विजयी झाले, तर ॲड. अर्चना माळी यांना 88 मते मिळाली. सभासद पदासाठी ॲड. केवळ गावंड (108 मते), ॲड. जितेंद्र कातरणे (106 मते) व ॲड. मच्छिंद्र घरत (96 मते) विजयी झाले. या पदासाठी नोटाला 67 मते मिळाली. लेखापाल पदासाठी ॲड. शहजाद पठाण यांची बिनविरोध निवड झाली. तसेच महिला सभासद राखीव पदासाठी ॲड. सोनम ठाकूर व ॲड. दश्वता पराडकर यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. संपदा मोकल व ॲड. अपूर्वा ठाकूर यांनी निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. निवडणूक प्रतिनिधी म्हणून ॲड. भार्गव पाटील, ॲड. गोविंदा घरत, ॲड. अभिषेक म्हात्रे व ॲड. रोहन म्हात्रे यांनी सहकार्य केले. नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. किशोर ठाकूर व त्यांच्या कार्यकारिणीचे विविध मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.







