| पुणे | वृत्तसंस्था |
पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) आयोजित पीएमडीटीए मानांकन ओम दळवी स्मृती टेनिस स्कूल करंडक बारा व चौदा वर्षाखालील गटाच्या ब्रॉन्झ सिरिज टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात श्रीमई संतोष, श्रीजा कलशेट्टी, शरण्या सावंत तर मुलांच्या गटात आदित्य उपाध्ये, विआन पेंडुरकरने मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का दिला.
औंध, परिहार चौक येथील महाराष्ट्र पोलिस टेनिस जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत बारा वर्षांखालील मुलींच्या गटात बिगरमानांकित श्रीमई संतोषने पाचव्या मानांकित गौरी बगाडेचा 6-4 असा, चौथ्या मानांकित श्रीजा कलशेट्टीने तनया साठेचा 6-1 असा, अव्वल मानांकित वाण्या अगरवाल व दुसर्या मानांकित शरण्या सावंतने आराध्या राठी व सर्वज्ञा जगतापचा 6-0 अशा फरकाने तर तिसर्या मानांकित सान्वी गोसावीने आराध्या मेंडकेपाटीलचा टायब्रेकमध्ये 6-5(1) असा पराभव केला. मुलांच्या गटात अव्वल मानांकित आर्यन बॅनर्जीने राजदीप नगरकरवर 6-2 असा, आदित्य उपाध्येने पाचव्या मानांकित आदित्य शहावर 6-4 असा, विआन पेंडुरकरने आठव्या मानांकित विवान डिक्करवर 6-2 असा तर दुसर्या मानांकित अहान भट्टाचार्यने कुमार कौटिल्यवर 6-0 असा विजय मिळविला.
निकाल : बारा वर्षांखालील मुले : आर्यन बॅनर्जी वि.वि. राजदीप नगरकर 6-2; पलाश जैन वि.वि. ईशान जोशी 6-2; रयान जॉर्ज वि.वि. अगस्त्य समनवार 6-0; विआन पेंडुरकर वि.वि. विवान डिक्कर 6-2; आदित्य उपाध्ये वि.वि. आदित्य शहा 6-4; विहान सक्सेना वि.वि. राजवर्धन खानेकर 6-1; ए. रिषभ वि.वि. बलराज बिराजदार 6-2. मुली : वाण्या अगरवाल वि.वि. आराध्या राठी 6-0; प्रियल दौंडकर वि.वि. दिव्या गाढे 6-0; श्रीजा कलशेट्टी वि.वि. तनया साठे 6-1; थिया देसाई वि.वि. आरिका ताम्हाणे 6-3; श्रीमई संतोष वि.वि. गौरी बगाडे 6-4; सान्वी गोसावी वि.वि. आराध्या मेंडकेपाटील 6-5 (1); पलक पाटील वि.वि. आनंदी शेंडगे 6-3; शरण्या सावंत वि.वि. सर्वज्ञा जगताप 6-0.