गंभीरकडून डच खेळाडूची वकिली

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

टी-20 विश्वचषकानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि त्यांच्या सहयोगी प्रशिक्षकांचा कार्यकाळ संपला आहे. आता गौतम गंभीरला भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक बनवण्यात आला आहे. गौतम गंभीरला भारतीय संघाचा प्रशिक्षक बनवल्यानंतर आता भारतीय संघाचे फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, गौतम गंभीर भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून एका डच खेळाडूच्या नावाची वकिली करत आहेत. गौतम गंभीरने ज्या खेळाडूचे नाव सुचवले आहे ते नेदरलँड्सचे माजी स्टार खेळाडू रायन टेन डोशेट आहे. रायन हे 2024 मध्ये गंभीरचे सहाय्यक प्रशिक्षक होते. गौतम गंभीरने बीसीसीआयला 44 वर्षीय माजी डच आंतरराष्ट्रीय खेळाडू रायन टेन डोशेट यांना प्रशिक्षक म्हणून जोडण्याची विनंती केली आहे.

Exit mobile version