अफगाणी सुफी धर्मगुरूची गोळ्या झाडून हत्या; हत्यार्‍यांचा तपास सुरु

। नाशिक । वृत्तसंस्था ।
गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून आता येवला तालुक्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे. येवला तालुक्यातील चिंचोडी एमआयडीसी परीसरात मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास एका अफगाण सुफी सय्यद नावाच्या व्यक्तीची अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडुन हत्या केल्याची घटना घडली.

सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिस्ती असे या अफगाणी नागरिकाचे नाव असून ते अफगाण धर्मगुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आर्थिक वादातून त्यांची हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. तर घटनेदरम्यान गोळीबाराचा आवाज आल्यानंतर स्थानिकांनी धाव घेत दोघांना पकडले असून चौघेजण यातून निसटले आहेत.

शहर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. दरम्यान चिचोंडी एमआयडीसी परिसरात अज्ञात व्यक्तीचा खून झाल्याची माहिती पोलिस पाटील वनिता मढवई यांनी येवला शहर पोलिसांना दिली असुन वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.

Exit mobile version