| फ्लोरिडा | वृत्तसंस्था |
टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानाने 21 धावांनी पराभूत करत इतिहास रचला आहे. अफगाणिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना 6 बळीवर 148 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया 127 धावांपर्यंत मजल मारू शकली. अफगाणिस्तानपुढे ग्लेन मॅक्सवेलने एकाकी झुंज दिली मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही.
प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 149 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ 127 धावांवर सर्वबाद झाला. अफगाणिस्तानकडून गुलाबदिन नायबने 4 बळी, नवीन-उल-हकने 3 बळी घेतले. ऑस्ट्रेलियन संघाने 6 वेळा एकदिवसीय विश्वचषक आणि एकदा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. अफगाणिस्तानने या बलाढ्य संघाचा पराभव केल्याने सर्वत्र कौतुकांचा वर्षाव केला जात आहे. ऑस्ट्रेलियाने आज सामना जिंकला असता, तर उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले असते. आता होणारा ऑस्ट्रेलियाला भारताविरूद्धचा सामना जिंकावाच लागणार आहे.
ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले अफगाणिस्तानविरुद्ध मैदानात उतरलेल्या दिग्गजांनी भरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने शरणागती पत्करली. ऑस्ट्रेलियन संघ पूर्ण 20 षटकेही खेळू शकला नाही. 19.2 षटकात 127 धावा करून ती ऑलआऊट झाली. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने 41 चेंडूंचा सामना करत 59 धावा केल्या. त्याने 6 चौकार आणि 3 षटकार मारले. कर्णधार मिचेल मार्श 12 धावा करून बाद झाला. मार्कस स्टॉइनिस 11 धावा करून बाद झाला. सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला खातेही उघडता आले नाही. स्टॉइनिस 11 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मॅथ्यू वेड 5 धावा करून बाद झाला.
अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची दमदार कामगिरी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियालाची चांगलीच कोंडी केली. गुलाबदिन नायबने 4 षटकांत फक्त 20 धावा देत 4 बळी घेतले. नवीन-उल-हकने 4 षटकांत 20 धावा देत. मोहम्मद नबीने 1 षटकात फक्त 1 धाव दिली आणि 1बळी घेतला. कर्णधार राशिद खानलाही यश मिळाले. ओमरझाईनेही एक बळी घेतला.