अफगाणिस्तानचा सर्वात मोठा विजय

। न्युयॉर्क । वृत्तसंस्था ।

टी-20 विश्‍वचषक स्पर्धेतील पाचवा सामना अफगाणिस्तान विरुद्ध युगांडा संघात पार पडला. गयानाला झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने तब्बल 125 धावांनी विजय मिळवला. यासह या स्पर्धेतील आपल्या मोहिमेची विजयाने सुरुवात केली आहे. दरम्यान, अफगाणिस्तानचा हा आंतरराष्ट्रीय टी-20 मधील धावांच्या तुलनेतील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा विजय आहे. तसेच, टी-20 वर्ल्ड कपमधील हा एकूण चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विजय आहे.

या सामन्यात अफगाणिस्तानने युगांडासमोर 184 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना युगांडा संघ 16 षटकातच अवघ्या 58 धावांवर सर्वबाद झाले. त्यांनी फक्त 18 धावांतच 5 विकेट्स गमावल्या होत्या. युगांडाकडून फक्त रियाझत अली शाह आणि रॉबिन्सन ओबुया यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. रियाझतने 11 धावा केल्या, तर रॉबिन्सनने 14 धावा केल्या. तसेच चार खेळाडू शुन्यावरच बाद झाले. अफगाणिस्तानकडून गोलंदाजीत फझलहक फारुकीने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. त्याने 4 षटकात केवळ 9 धावा देत या 5 विकेट्स घेतल्या. तसेच नवीन-उल-हक आणि कर्णधार राशिद खान यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

टी-20 विश्‍वचषकातील मोठे विजय
172 धावा- श्रीलंका विरुद्ध केनिया,
130 धावा- अफगाणिस्तान विरुद्ध स्कॉटलंड
130 धावा- दक्षिण आफ्रिका विरुद्ध स्कॉटलड,
125 धावा- अफगाणिस्तान विरुद्ध युगांडा,
116 धावा- इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान
Exit mobile version