हैदराबादसमोर मुंबईचे आव्हान
। केप टाउन । वृत्तसंस्था ।
इंडियन प्रीमिअर लीग 2025 स्पर्धेचे वारे जोरात वाहत असताना लीगचे वेळापत्रक समोर आले आहे. सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझी आणि मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचे संघ पहिल्याच लढतीत समोरासमोर येणार आहेत. गतिवेजेता सनरायझर्स ईस्टर्न केप संघ दक्षिण आफ्रिका टी-20 लीगचा सलामीचा सामना खेळणार आहे. त्यांच्यासमोर मुंबई इंडियन्स केप टाऊन संघाचे आव्हान असणार आहे. सनरायझर्स ईस्टर्न केप संघ त्यांच्या घरच्या मैदानावर म्हणजेच जॉर्ज पार्क येथे हा सामना 9 जानेवारी ला खेळवण्यात येणार आहे. एसए-20 लीगच्या तिसर्या पर्वाचे वेळापत्रक जाहीर झाले असून 8 फेब्रुवारी ला जोहान्सबर्गच्या वंडरर्स स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे.
मागील दोन पर्वांतील उपविजेते प्रेटोरिया कॅपिटल्स आणि डर्बन सुपर जायंट्स यांच्यात दुसरा सामना होणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या शनिवारी डबल हेडर मुकाबल्यात पर्ल रॉयल्स वि. सनरायझर्स आणि जोबर्ग सुपर किंग्स वि. एमआय केप टाऊन समोरासमोर असणार आहेत. 30 दिवस चालणार्या या लीगमधील अव्वल चार संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरणार आहेत. पहिला पात्रता सामना 4 फेब्रुवारीलाल होणार असून सुपर स्पोर्ट्स पार्क येथे बाद सामना (5 फेब्रुवारी) आणि दुसरा पात्रता सामना (6 फेब्रुवारी) या लढती होणार आहेत. तसेच, एका दिवसाच्या आरामानंतर अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.
एसए-20च्या तिसर्या पर्वात न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विलियम्सन हा सुपर जायंट्सकडून खेळताना दिसणार आहे. तसेच, भारताचा माजी यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक रॉयल्सकडून खेळणार असून त्याच्या संघात इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटही असणार आहे.
एमआयसीटीने रिटेन केलेले खेळाडू
एमआयसीटीने अष्टपैलू खेळाडू राशीद खान याला करारबद्ध केले आहे आणि न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्टही फ्रँचायझीकडून खेळणार आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स, अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू अझमतुल्लाह ओमारझाई, श्रीलंकेचा नुवान तुषारा आणि ख्रिस बेंजामिन यांनाही फ्रँचायझीने संघात कायम राखले आहे. प्री साईन स्थानिक खेळाडूंमध्ये कागिसो रबाडा, डेवॉल्ड ब्रेव्हिस, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, रायन रिकल्टन, जॉर्ज लिंडे, डेलानो पॉटगिएटर, थॉमस कबेर आणि कोनोर यांचा समावेश आहे.