। अलिबाग । वर्षा मेहता ।
सर्वात तेजस्वी तसेच दुर्मिळ असणारा धुमकेतू म्हणजेच लिओनार्ड. लियोनार्ड धूमकेतू या महिन्यात पृथ्वी जवळून जाणार आहे. त्यामुळे या धूमकेतूची जगभरात चर्चा सुरु होती. हिरव्या रंगाची शेपूट असणारा असा एखादा धूमकेतू पृथ्वी जवळून जाण्याची ही 35 हजार वर्षांमधील पहिली घटना होती. खगोलशास्त्रज्ञ गिरीश पिंपळे यांच्यामते 12 डिसेंबरला या धूमकेतूचा प्रकाश सर्वाधिक तीव्र होता. त्यानंतर तो परत दिसण्याची शक्यता नसल्याचेही त्यांनी सांगितले.
सौर यंत्रणेबद्दल जाणून घेणे नेहमीच आकर्षक असते. जेव्हा लोकांना ग्रहणे प्रत्यक्षात पाहायला मिळतात तेव्हा ते आणखीनच आकर्षक बनते. अलीकडे लिओनार्ड धूमकेतूला पाहणे हा एक दुर्मिळ योग जुळून आला होता. कारण हा धूमकेतू पुन्हा कधीही सौरमालेत परत येणार नाही. हा कोणताही सामान्य धूमकेतू नाही. हा धुमकेतू अंतराळात दूरवरून येणारा, सूर्याच्या भोवती फिरणारा आहे. जवळजवळ 35 हजार वर्षानंतर तो दिसला.
धूमकेतू लिओनार्ड 12 डिसेंबरला पृथ्वीच्या सर्वात जवळ होता. धूमकेतू लिओनार्ड उघड्या डोळ्यांना दिसेल असे तज्ज्ञांचे मत आहे. तरीही, दुर्बिण किंवा टेलिस्कोप घेऊन जाण्याचा सल्ला दिला जातो. भारतातूनही ते पाहणे शक्य असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले होते. हा धूमकेतू नुकताच खगोलशास्त्रज्ञ ग्रेगरी जे लिओनार्ड यांनी जानेवारी 2021 मध्ये शोधला होता. अधिकृतपणे उ/2021 अ1 असे नाव देण्यात आले आहे.
सध्याच्या खगोलशास्त्रीय अंदाजानुसार, धूमकेतू सूर्याजवळून गेल्यानंतर सूर्यमालेतून बाहेर जाण्याची शक्यता आहे. या मार्गानंतर लिओनार्ड परत येण्याची अपेक्षा नाही. जेव्हा लिओनार्ड दिसला तेव्हा आकाशातील त्याचे स्थान छॠउ 4631 (व्हेल आकाशगंगा टोपणनाव) च्या मध्यभागी होते. 3 जानेवारी 2022 रोजी धूमकेतू सूर्याच्या सर्वात जवळ असेल.
12 डिसेंबरला तो सगळ्यात चागल्या पद्धतीने दिसला. तो पृथ्वीच्या सगळ्यात जास्त जवळ आला होता. लिओनार्ड धूमकेतू आता पृथ्वीपासून लांब जात जाणार. तो आता परत दिसण्याची शक्यता नाही. हे धूमकेतू शहरी भागात जास्त लाईट असल्यामुळे तेव्हा स्पष्ट दिसत नाही. शहराच्या बाहेरील भागात दिसतात. ते थेट डोळ्यांना नाही. दिसत त्यासाठी दुर्बिण लागेल कारण धूमकेतूचा वेग जास्त असतो. 47 किमी. पर सेकंड एवढा वेग आहे.
गिरीष पिंपळे, खगोलशास्त्रज्ञ
धूमकेतू कुठून येतात?
सौर यंत्रणाच्या बाहेर एक मोठा क्लाऊड आहे त्याला ऊर्ट क्लाऊड त्याच्या त्यात लाखो धूमकेतू आहेत.त्यातले काही धूमकेतू सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे खेचले जातात. मग ते सूर्या भोवती फिरुन परत जातात. म्हणून जेव्हा ते सूर्याकडे जात असतात तेव्हा ते आपल्याला दिसतात. ते पृथवीसाठी येत नाहीत ते सूर्या भोवती जात असताना पृथ्वीला पास होतात म्हणून आपल्याला दिसतात.