49 वर्षानंतर बहिरीवाडी ग्रामस्थांना मिळाला सातबारा

। माणगाव । वार्ताहर ।
49 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पाटणूस पंचक्रोशीतील पुनर्वसीत गाव बहिरीवाडीच्या ग्रामस्थांना त्यांच्या नावे सातबारा देण्यात आला. त्यामुळे त्यांच्या विकासाचा मार्ग अखेर खुला झाला असून ग्रामस्थांना नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात आ. अनिकेत तटकरे यांचे हस्ते सातबारा चे वाटप करण्यात आले.
आनंदी झालेल्या ग्रामस्थांनी दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी करीत फटाके फोडले. खा. सुनिल तटकरे यांनी लोकसभा निडणुकीच्या प्रचारा दरम्यान पुनर्वसीत बहिरीच्यावाडीत गेले होते. त्यावेळी ग्रामस्थांनी पुनर्वसनाच्या वेळी सातबारा नावे नसल्याची समस्या मांडली होती.त्यामुळे या प्रकरणात खा. तटकरे यांनी लक्ष घालून शासनाकडून नागरिकांच्या नावे सातबारा केला. त्यामुळे सातबाराच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्‍वास सोडला आहे.
यावेळी बाबू खानविलकर,संतोष लाड, गणेश सकपाळ,निलामा निगडे,चंद्रकांत गुजर,गजानन मोहिते, मनोहर धामुनसे,निलेश वांजले,सौरभ देशपांडे, सिनमेती, श्री. लोहार, जयदीप म्हामुणकर, दीपक बामगुडे, देविका पाबेकर,संतोष बांदल, राहुल गुजर, विजय अंबावले, उपस्थित होते.

Exit mobile version