कोरोनानंतर झिका व्हायरससाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

आरोग्य विभागाकडून सतर्कतेचा इशारा
५ वर्षाच्या चिमुकलीचे झिका रिपोर्ट्स पॉजिटिव्ह

। मुंबई । वृत्तसंस्था ।

कोरोना व्हायरसची भिती लोकांमध्ये कमी होताच आता झिका व्हायरसने शासनाची चिंता वाढवली आहे. झिकाचा पुण्यात रूग्ण सापडल्यानंतर आता कर्नाटक राज्यात पाच वर्षाच्या चिमुकलीमध्ये झिका व्हायरसचा विषाणू आढळून आला. शासन आता नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ते पाऊल उचलत लवकरच नव्या गाईडलाईन जाहीर करतील असे आरोग्य मंत्री के. सुधाकर यांनी सांगितले.

के सुधाकर यांनी सांगितले की, पुणे लॅबमध्ये पाठवल्या गेलेल्या सँपल्समध्ये झिका व्हायरसचा विषाणू सापडला. ५ डिसेंबरला एकूण तीन सँपल लॅबमध्ये पाठवले गेले होते. यातील दोन रिपोर्ट्स निगेटीव्ह तर एक पॉजिटीव्ह आली. ही रिपोर्ट एका पाच वर्षीय तरूणीची होती. या मुलीवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे.

काय आहे झिका व्हायरस?
झिका व्हायरस डासांपासून पसरणारा व्हायरस आहे. हा आजार एडीस डासांमुळे पसरतो. या व्हायरसची बाधा धोकादायक असून तुम्हाला रूग्णालयात देखील भर्ती करावे लागू शकते. या विषाणूची लागण झाल्यास तुम्हाला त्याची लक्षणेही सहसा दिसत नाही. सांदेदुखी, डोकेदुखी, पाय दुखणे यांसारख्या समस्या तुमच्या मुलांत किंवा तुमच्यात दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

Exit mobile version