क्रिकेटनंतर आता रेसिंगमध्ये ‘दादा’गिरी

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

इंडियन रेसिंग फेस्टिव्हलचा नवीन सीझन 24 ऑगस्टपासून सुरू होत आहे. पहिल्यांदाच रात्रीची शर्यत ही चेन्नईच्या स्ट्रीट रेसिंग सर्किटमध्ये 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी राऊंड 2 चा भाग म्हणून आयोजित केली आहे. आता याचा तिसरा सीजन लवकरच येणार आहे. यामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीने देखील उडी घेतली आहे. 2024 च्या सीझनमध्ये कोलकता रॉयल टायगर्स रेसिंग या संघाचा तो मालक असणार आहेत.

यामध्ये इंडियन रेसिंग लीग आणि फॉर्म्युला 4 इंडियन चॅम्पियनशिप अशा दोन मुख्य चॅम्पियनशिपचा समावेश आहे. कोलकाता, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, गोवा, कोची आणि अहमदाबाद या प्रमुख आठ शहरांवर आधारित संघांची स्पर्धा ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत दरम्यान होणार आहे. ही स्पर्धा रोमहर्षक असून कोलकाता संघ नव्याने दाखल झाल्याने या स्पर्धेची उत्सुकता अजून वाढली आहे. कोलकाता रॉयल टायगर्स ही सौरव गांगुलीच्या मालकीची टीम असल्याने पश्‍चिम बंगाल आणि पूर्व भारतात मोटर रेसिंगला अधिक उत्साह आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल, असे अंदाज आहेत.

Exit mobile version