खुशखबर! दिवाळीनंतर नवी मुंबईकरांना मेट्रोने करता येणार प्रवास

ऑसिलेशन चाचणीची सिडको व महामेट्रोकडून पाहणी
। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
नवी मुंबई मेट्रो सुरू करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची मानली जाणारी ऑसिलेशन व इमरजन्सी ब्रेक डिस्टन्स चाचणी गेली आठवडाभर सुरू असून सिडकोचे व्यवस्थापकीय संचालत डॉ. संजय मुखर्जी व इतर उच्च अधिकार्‍यांनी या महत्वाच्या चाचणीची पाहणी केली.

सिडकोने हे काम सध्या राज्य सरकारच्या महामेट्रोला दिले आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर या मार्गाचे संचालन व देखभाल देखील महामेट्रो करणार आहे. त्यामुळे महामेट्रोचे उच्च अधिाकारी या पाहणीच्या वेळी उपस्थित होते. बेलापूर ते पेंदार या एकूण 11 किलोमीटर अंतरापैकी पेंदार ते सेंट्रल पार्क हा पाच किलोमीटर अंतराचा मार्ग पहिल्यादा सरू होणार असून तो दिवाळीनंतर सरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महामुंबई क्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सिडकोने दहा वर्षांपूर्वी चार मेट्रो मार्गाचा आराखडा तयार केला आहे. त्यातील बेलापूर ते पेंदार या मार्गाचे काम एक मे 2011रोजी सुरू करण्यात आले आहे. पहिल्या चार वर्षांत हा मार्ग सुरू होईल असे आश्‍वासन सिडकोच्या वतीने देण्यात आले होते, पण ते पाळण्यात आले नाही. त्यामुळे गेली सहा वर्षे हा मार्ग रखडला आहे. त्याला व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी चालना दिली आहे.


भारतीय रेल्वेच्या र्सिच डिझाईन अ‍ॅन्ड स्टॅण्र्डड ऑरगनार्झन (आरडीएसओ) वतीने 28 ऑगस्टपासून नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील बेलापूर ते पेंधर या मार्ग क्रमांक 1 वर पेंधर स्थानक ते सेंट्रल पार्क स्थानकादरम्यानच्या 5.14 किलोमीटर अंतरावर ऑसिलेशन आणि इमर्जन्सी ब्रेक डिस्टन्स चाचणी घेण्यात येत आहे. ही चाचणी 14 सप्टेंबपर्यंत सुरू राहणार आहे. या पाहणीत व्यवस्थापकीय संचालक अश्‍विनी मुदगल, कैलाश शिंदे, मुख्य अभियंता के. एम.गोडबोले, अतिरिक्त मुख्य अभियंता संजय नाडगौडा आणि इतर उच्च अधिकारी उपस्थित होते. याशिवाय महामेट्रोचे कार्यकारी संचालक नामदेव रबाडे उपस्थित होते.

Exit mobile version