पाऊस थांबल्यानंतर मतदारांचा उत्साह कायम

बारणेंकडून फेर मतदानाची मागणी

| नेरळ | प्रतिनिधी |

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी काल मतदान पार पडले. त्यात कर्जत विधानसभा मतदारसंघात 61.40 टक्के मतदान झाले आहे. कर्जत तालुक्यात मतदानाच्या दिवशी अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी अडचणी आल्या आणि त्यामुळे कर्जत तालुक्यात फेरमतदान घेण्याची मागणी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवून केली आहे. तर, याच भागात मतदानाची वेळ वाढवून देण्याची मागणी देखील केली होती.

मावळ लोकसभा मतदारसंघात (दि.13) मे रोजी मतदान पार पडले. मतदान सुरू असताना दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस आला. कर्जत तालुक्याच्या प्रत्येक भागात अवकाळी पावसाने साधारण दीड ते दोन तास जोरदार पर्जन्य वृष्टी केली. काही भागात गारांचा पाऊस देखील झाला आणि त्यामुळे कळंब, कशेले, नांदगाव, खांडस भागात दुपारी दोन ते चार तर तर नेरळ डिकसळ कडाव भागात अडीच ते चार आणि कर्जतमध्ये साडे तीन ते पाच या वेळेत अवकाळी पाऊस सुरू होता.

दुपारी उन्हाचा तडाखा वाढणार असल्याने मतदारांनी संध्याकाळचा पर्याय निवडला होता. मात्र, दुपारी सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यास अडथळे निर्माण झाले. त्यामुळे मतदानाची वेळ वाढवून देण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र निवडणूक आयोगाला पाठवले. त्यांनी आपल्या पत्रामध्ये कर्जत तालुक्यात वादळी पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे, मतदान केंद्रावर अंधार पसरला आहे आणि मतदान करण्यासाठी मतदान हा घरातून बाहेर पडू शकत नाही.अशा वेळी मतदानाची वेळ वाढवून देण्याची मागणी आयोगाने मान्य केली नव्हती. मात्र पाऊस सुरू असताना देखील मतदान सुरू होते आणि त्यामुळे महायुतीचे उमेदवार यांची फेर मतदान घेण्याची मागणी मान्य होण्याची शक्यता कमी आहे.

कर्जत विधानसभा मतदारसंघातील 339 मतदान केंद्रावर सुरळीत मतदान झाले. सायंकाळी पाचपर्यंत 49.04 टक्के मतदान होते आणि सायंकाळी सहा वाजता मतदानाची वेळ संपली त्यावेळी अंतिम 3तदान हे 61.40 टक्के एवढे झाले. त्यामुळे अवकाळी पावसात कुठेही मतदानावर परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. कर्जत विधानसभा मतदारसंघात 3 लाख 9 हजार 208 मतदार आहेत, त्यातील 1लाख 89 हजार 853 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात पुरुष मतदारांची संख्या मोठी असून तब्बल 102512 पुरुष तर 87340 हजार महिला मतदारांनी आणि एक अन्य मतदाराने मतदान केले. मतदानाची ही सरासरी ही 61.40 टक्के एवढी आहे. मतदानाची टक्केवारी साधारण अपेक्षित असल्याने महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि महा विकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्यात मावळ लोकसभेसाठी प्रचंड चुरस कर्जत विधानसभा मतदारसंघात दिसून येत आहे.

Exit mobile version