तीन महिन्यांनंतर लागला चोरीचा छडा

कर्जत रेल्वे पोलिसांच्या पथकाला यश

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत रेल्वे पोलीस यांच्या हद्दीत उपनगरीय लोकलमधून प्रवास करताना एका महिला प्रवाशाचे सोन्याचं मंगळसूत्र चोरी झाले होते. त्याबाबत रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार कर्जत रेल्वे पोलिसांना त्या महिला प्रवाशाचा मुद्देमाल शोधण्यात यश आले असून, दि. 7 जुलै रोजी 40 हजार किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र सुमन प्रकाश वीर या महिला प्रवाशाचे ताब्यात देण्यात आले.

मार्च 2023 मध्ये कर्जत रेल्वे पोलीस यांच्या हद्दीत सुमन प्रकाश वीर यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरीस गेले होते. त्याबाबत त्यांनी रेल्वे पोलीस यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास 39/2023 प्रमाणे तपास करताना त्यांचा शोध लावला होता आणि ते 40 हजार रुपये किमतीचे काळे मणी आणि सोन्याच्या वाट्या असलेले मंगळसूत्र कल्याण न्यायालयात जमा करण्यात आले होते. ते मंगळसूत्र मंगळवारी कर्जत पोलीसांच्या माध्यमातून महिला प्रवासी सुमन प्रकाश वीर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव तसेच पोलीस हवालदार ज्ञानेश्‍वर पाटील, गोपनीय विभगाचे राज बागुल आदी उपस्थित होते.

Exit mobile version