दोन दिवसानंतर आली आमदाराना जाग; मुरुडकरांनी दळवीना सुनावले खडेबोल, आमदारांचा काढता पाय… पहा व्हिडीओ

मुरुड | प्रतिनिधी |

शिवसेना आमदारांची संतप्त युवक कार्यकर्त्यांनी केली बोलती बंद; मुरुड लक्ष्मिखार येथे पुरजन्य परिस्थिती, गावातील नागरिकांचे अचानक आलेल्या पुरामुळे झाले नुकसान.

सोमवारी सकाळी झालेल्या अतिवृष्टीमुळे लक्ष्मिखार गावातील काही भागात पुराचे पाणी अचानक शिरले व सकाळी 6 वाजता घराघरांमध्ये पाणी शिरले. या अचानक शिरलेल्या पाण्याने नागरिकांची अचानक तारांबळ उडाली यामध्ये लोकांच्या घरातील वस्तू तसेच कपडे अन्नधान्याचे नुकसान झाले. लक्ष्मिखार गावात ओढवत असलेल्या पुरजन्य परिस्थितीबाबत अनेकवेळा ग्रामस्थ तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका युवक अध्यक्ष मनिष माळी यांनी वारंवार पालिकेकडे अशा परिस्थितीवर नियंत्रण व्हावं याकरिता नियोजन करावं अशी मागणी केली होती. परंतु पालिकेकडून आजपर्यंत अशी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही.

आज अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला त्यावेळी नागरिकांशी संवाद साधत असताना मनिष माळी यांनी लक्ष्मिखार गावाची परिस्थिती मांडली. शिवसेना सत्ताधारी असलेल्या पालिकेकडून पूर परिस्थितीबाबत कोणत्याही प्रकारचं नियोजन झालं नसल्याची जाणीव करून दिली.

यासाठी गेली सात साडेसात वर्ष यासाठी आणि मुरुडमधील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी चे नियोजन नाही,आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कि पूर आलेला असताना सोमवारी मुरुड नगरपालिकेने दुपारी नळाचं पाणी बंद केलं त्यामुळे लोकांना प्यायला पाणी नव्हत आणि लोकांना आदल्या दिवशी भरून ठेवलेल्या पाण्यावर राहावं लागले. गावात पाणी शिरण्याची काही कारणे आहेत त्यामध्ये मुरुड शीघ्रे रोड वर असलेल्या मोरीच स्लॅब ड्रेनेज करण्याची मागणी गेली 4 वर्षे सातत्याने होत आहे. यासाठी PWD च्या अधिकाऱ्यांना विरोधीपक्ष नेते व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी वारंवार सूचना केल्या होत्या. परंतु PWD विभगाचा धिमा कारभार नागरिकांच्या नुकसानीसाठी जबाबदार आहे. शिवाय मँग्रोज च्या खाडी पट्ट्यात अनधिकृत भराव करून बांधकाम केल्यामुळे खाडीचे पाणी आणि नदीचे पाणी एकत्रित गावात शिरले.

तीवराच्या झाडांवर होणारे अनाधिकृत भरावांकडे प्रशासन जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहेत. परंतु राजकीय हितसंबध जोपासण्यासाठी आणि आपल्या मतपेट्या वाचवण्यासाठी नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्याचं काम तालुका व मुरुड पालिका प्रशासन करीत आहे. हे सगळे ऐकून काहीच उत्तर नसल्याने आमदारांनी यासंधर्भात नगराध्यक्षांना पत्र देण्यास सांगून काढता पाय घेतला

Exit mobile version