अलिबाग । प्रतिनिधी ।
मुरुडमध्ये सोमवारी रात्री अकराच्या सुमारास अचानक ढगफुटी झाली.यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गणपती दोन दिवसावर आले असताना नागरिकांच्या घरात जवळपास ३-४ फुट पाणी घुसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच दुकानांमधील माल खराब झाला असून वाहनांचेही नुकसान झाले.