युट्युबवर गाजतेय आगरी-कोळी श्रीवल्ली!

। सायली पाटील। अलिबाग ।
सध्या सगळीकडेच चर्चेत असणार्‍या पुष्पा चिपटाने सर्वांनाच वेड लावले आहे. आणि त्या चित्रपटातील गाण्यांनी तर प्रत्येेकाच्या मनावर जादू केली आहे. पुष्पा मधीलच सुप्रसिद्ध झालेले श्रीवल्ली हे गाणं आता आगरी-कोळी व्हर्जनमध्ये आलं असून प्रशांत म्हात्रे ऑफिशिअल या युट्युब चॅनलवर चांगलेच हिट होत आहे. आगरी- कोळी भाषा ही मूळातच अलिबागकरांची शान आहे. त्यामुळे अलिबागची शान असणार्‍या या आगरी-कोळी भाषेलाच श्रीवल्लीचे नवे व्हर्जन बनवत अलिबाग मधील प्रसिद्ध गायक प्रशांत म्हात्रे यांनी या गाण्याची गीत रचना व गायन केले आहे. तर, सुप्रसिद्ध गायिका, नृत्यांगना व अभिनेत्री जुईली पाटील-म्हात्रे यांनी या गाण्यात अभिनय केला आहे.

सध्या सगळीकडे पुष्पा या चित्रपटाची चर्चा आहे. अल्लू अर्जून या दक्षिणात्य अभिनेत्याने अभिनय केलेल्या पुष्पा या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. चित्रपटाप्रमाणेच यातील गाणीसुद्धा खुप गाजत आहेत. श्रीवल्ली या गाण्याने तर जगाला वेड लावले आहे. भारतातील अनेक प्रादेशिक भाषांमध्ये या गाण्याचे रूपांतर झाले आणि तेसुद्धा खुप गाजले. आणि म्हणूनच रायगड, मुंबई व ठाण्यात बोलल्या जाणार्‍या आगरी-कोळी भाषेत या गाण्याचे रूपांतर करावे असे गायक, गीतकार व संगीतकार प्रशांत म्हात्रे यांना वाटले. प्रशांत म्हात्रे यांनी आपल्या स्थानिक भाषेत त्यांचे रूपांतर केले आणि स्वतः गाऊन आगरी-कोळी श्रीवल्ली या नावाने हा व्हिडिओ युट्युबवर टाकला आणि अल्पावधीतच या गाण्याला दोन लाखांपेक्षा जास्त लोकांनी युट्युबवर पाहिले. अनेक लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव या गाण्यावर होत आहे. या गाण्यामध्ये गायिका, नृत्यांगना व अभिनेत्री जुईली पाटील-म्हात्रे हिने अभिनय केला आहे. तिचा या गाण्यातील सहज सुंदर अभिनय प्रेक्षकांना आवडला आहे.

मी स्वतः आगरी समाजाचा असल्यामुळे आपल्या स्थानिक भाषेचा गोडवा संपूर्ण जगाला कळावा म्हणून मी हा प्रयोग केला आहे.

प्रशांत म्हात्रे, गायक/संगीतकार/गीतकार
Exit mobile version