आगरी समाजाने एकजुटीने रहावे

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे आवाहन
। नेरळ । कांता हाबळे ।
रायगडातील आगरी समाजाने एकजुटीने राहून शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात प्रगती साधावी असे आवाहन केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी केले आहे. कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या वतीने तालुक्यातील आगरी समाजातील इ. दहावी 12 मध्ये विशेष प्राविण्य मिळवेल्या विद्यार्थांचा तसेच इतर क्षेेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवतांचा गुणगौरव सोहळा नेरळ येथील हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेक गुणवंतांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला
जिल्ह्यातील आणि आगरी समाजातील पाहिले आय.ए.एस झालेले प्रतिक चंद्रशेखर जुईकर तसेच शौर्यवीर मयुर शेळेचे यांचा विशेष सन्मान आणि कर्जत तालुका आगरी समाज भूषण पुरस्कार 2021 हा इतिहास संशोधक वसंत कोेळंबे यांना कपिल पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला
यावेळी आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष सावराळाराम जाधव, माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, समाजाचे उपाध्यक्ष केशव मुने, सचिव शिवराम बदे, सहसचिव अरूण कराळे, भगवान धुळे, शिवराम महाराज तुपे, संतोष एनकर, दिलीप मिसाळ, अंकुश दुर्गे, मनिषा दळवी, सुरेश गोमारे, विजय कोंडिलकर, सुरेश मंगेश म्हसकर, कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विरले, उपसरपंच रोशन म्हसकर, राजेश भगत, दीपक खाटेघरे, तसेच आगरी समाज संघटनेचे अनेक पदाधिकारी, आणि समाज बांधव व गुणवंत विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने होते.

एकजुटीने रहा, काम करा, एकत्र राहिले तरच आपला समाज पुढे गेल्या शिवाय राहणार नाही, कोणीही आपल्याला हरवू शकत नाही त्यासाठी आपल्या एकत्र राहण्याची गरज आहे. – कपिल पाटील, केंद्रीय मंत्री.

Exit mobile version