पनवेल एसटी आगारावरून प्रवासी संघ आक्रमक

उपोषणाचा इशारा
| पनवेल | वार्ताहर |

पनवेल एसटी आगाराच्या दुरावस्थेबाबत प्रवासी संघ आक्रमक झाला असून या स्थानकाच्या दुरुस्तीकामाबाबत पुढाकार न घेतल्यास येत्या 1 नोव्हेंबर पासून उपोषणाचा इशारा प्रवासी संघाच्या पदाधिकार्‍यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. या पत्रकार परिषदेला प्रवासी संघाचे अध्यक्ष डॉ भक्तीकुमार दवे, उपाध्यक्ष यशवंत ठाकरे, सचिव श्रीकांत बापट व मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य अभिजीत पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ भक्तीकुमार दवे यांनी वेळोवेळी शासनाकडे केलेल्या पाठपुरावा संदर्भात माहिती दिली.

तसेच यावेळी वेळोवेळी केलेल्या आंदोलने व वरिष्ठांची बैठक आदी बाबत स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांनी सुद्धा सहकार्य केल्याचे सचिव श्रीकांत बापट यांनी सांगितले. तर अभिजित पाटील यांनी एसटी स्टँडच्या दुरावस्थेबाबत संताप व्यक्त करून महामंडळाच्या मनमानी कारभाराचा त्यांनी निषेध केला आहे. तसेच प्रवाशी वर्गांना भेडसावणार्‍या समस्या अत्याधुनिक पद्धतीने आगार उभारण्यासंदर्भात त्यांनी आवश्यक त्या सूचना केल्या. शासनाने आमच्या मागणीची दखल घेऊन प्रत्यक्ष काम सुरु करावे अन्यथा आम्हाला उपोषण करावे असे सांगितले.

एसटी स्टॅन्ड प्रश्‍न व रेल्वे स्थानकातील प्रवासी प्रश्‍न याबाबत आम्ही सातत्याने आमच्या परीने शासनाकडे पाठपुरावा करत असून लवकरच आम्हाला यश मिळेल अशी आशा वाटते.

– डॉ. भक्तीकुमार दवे (अध्यक्ष, प्रवासी संघ)

एस टी स्टँडच्या प्रश्‍नासाठी आम्ही शासनाकडे यापूर्वी पाठपुरावा केला आहे. व आगामी काळात सुद्धा करणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या नागरी प्रश्‍नासाठी एकत्रित येऊन लढा देणे गरजेचे आहे.

अभिजीत पाटील (मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य)
Exit mobile version